Advertisement

Breaking News
Loading...

“कोरे घराण्याला पराभूत करणाऱ्या कडते यांच्याकडे झेडपी सभापतीपदाची नजर”...

 


दक्षिण सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर आता चार विषय समितींच्या सभापतीपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी होणाऱ्या विशेष सभेत या निवडी पार पडणार असून, झेडपीमध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत असल्याने या निवडी बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.


सभापतीपदासाठी अंतिम निर्णय पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या स्तरावर होणार असल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.


बार्शी आणि उत्तर सोलापूर तालुक्याला संधी मिळाल्यानंतर आता अक्कलकोट, माळशिरस, मोहोळ, माढा किंवा पंढरपूर या तालुक्यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. मात्र, या सगळ्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप जिल्हा परिषद गटातून सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेल्या सोनाली प्रशांत कडते यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा रंगत आहे.

आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करताना सोनाली कडते यांना सलग पाच वर्षे दक्षिण पंचायत समितीच्या सभापतीपदाचा अनुभव मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी दक्षिण सोलापूरमधील प्रभावशाली कोरे घराण्याचा पराभव करत तब्बल सात ते आठ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.

मंद्रूप परिसरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जाणारा मतदारसंघ भाजपकडे खेचण्यात कडते यशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांची राजकीय ताकद अधोरेखित झाली आहे.

सोनाली कडते यांचे पती प्रशांत कडते हे संयमी व सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळेच मतदारांनी मोठ्या प्रमाणावर विश्वास दर्शवला असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, पक्षनिष्ठ आणि प्रभावी कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी मागणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांकडून होत असून, सोनाली कडते यांना सभापतीपदाची संधी मिळणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क करा:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत!


Post a Comment

0 Comments