Advertisement

Breaking News
Loading...

कमानीवर झेंडा लावताना विजेचा धक्का; स्वागत नगरमध्ये २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू...

 


सोलापूर शहर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : सोलापूर शहरातील स्वागत नगर परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत २४ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. केतन रमेश पाटोळे असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केतन पाटोळे हा मंडप सजावटीचे काम करत होता. बुधवारी (दि. २५) रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास स्वागत नगर येथील यशवंत सोसायटी परिसरात तो काम करत असताना ही दुर्घटना घडली. मंडपाच्या कमानीवर चढून झेंडा लावत असताना त्याच्या हातातील स्टील पाईपचा संपर्क महावितरणच्या विद्युत तारेशी आला. त्यामुळे तीव्र विजेचा झटका बसून तो थेट खाली कोसळला.

घटनेनंतर उपस्थितांनी तात्काळ केतनला सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

केतनच्या अकाली निधनाने पाटोळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईक व मित्रांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेमुळे संपूर्ण स्वागत नगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क करा:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत!

Post a Comment

0 Comments