वडापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे : मौजे वडापूर येथील महादेव मंदिर परिसरात रामनवमीच्या पावन निमित्ताने बाल संस्कार केंद्राच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. धार्मिक आणि सांस्कृतिक रंगांनी नटलेल्या या कार्यक्रमाने ग्रामस्थांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाची सुरुवात रामकथेच्या वाचनाने झाली. रिद्धी आणि अमृता यांनी प्रभावी श्लोक वाचन केले, तर त्याचा अर्थ भाग्यश्री सोडे यांनी सोप्या व सुंदर शब्दांत सांगितला. यामुळे उपस्थितांना रामकथेचा भावार्थ समजण्यास मदत झाली.
यावेळी बाल टाळकरींनी विविध अभंगांचे सादरीकरण करून वातावरण भक्तिमय केले. या अभंगांना संगीताची साथ बाल संस्कार केंद्राचे संस्थापक अध्यक्ष व वडापूर गावचे प्रतिष्ठित नागरिक अरुण भाऊ पाटील सर यांनी पेटीच्या माध्यमातून दिली. तसेच मार्गदर्शक भानुदास गुंड यांनीही कार्यक्रमाला मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले.
पखवाज वादनाची जबाबदारी आकांक्षा धारे, राव श्रवण पाटील, मुन्ना लांडगे आणि रेवती चव्हाण यांनी समर्थपणे पार पाडली. याशिवाय रेखा आईवळे, प्रगती, आरोही, हर्षदा, अश्विनी, निरज, शंभूराजे आणि प्रणिती या बालकलाकारांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाला वसंत सुतार, पत्रकार प्रभू पुजारी, रिपब्लिकन सेना सोलापूर जिल्हा प्रभारी सिद्धार्थ कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच वडापूर गावातील असंख्य महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात आणि उत्साहाच्या भरात पार पडला असून, बाल संस्कार केंद्राच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क करा:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!



0 Comments