Advertisement

Breaking News
Loading...

🇧‌🇷‌🇪‌🇰‌🇮‌🇳‌🇬‌ 🇳‌🇪‌🇼‌🇸‌ बोरामणी नाक्यावर भीषण अपघात; ट्रकखाली चिरडून दोघांचा जागीच मृत्यू...

 


सोलापूर शहर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : शहरात आज शुक्रवारी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास बोरामणी नाक्यावर एक भीषण अपघात घडला. भरधाव ट्रक चालकाने दोन जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली असून, या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


अपघातानंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत पोलिसांना घटनेची माहिती दिली.

मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून, दोन्ही मृतदेह पुढील तपासणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथे हलविण्यात आले आहेत.

दरम्यान, अपघात कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत असून, ट्रक चालकाबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, नागरिकांकडून वाहतूक नियंत्रण व सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क करा:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!

Post a Comment

0 Comments