सिंदखेड| हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे : दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड येथील श्री हनुमान यात्रेला आज, १ एप्रिलपासून उत्साहात प्रारंभ झाला आहे. चार दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार, १ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता श्री हनुमान व जिवाजी मास्तर यांच्या फोटोची मिरवणूक काढण्यात येणार असून, सायंकाळी ७ वाजता देवतांच्या मूर्तींना तेलाभिषेक (यण्णीमज्जन) होणार आहे.
गुरुवार, २ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता श्री हनुमान मूर्तीवर रुद्राभिषेक पूजा होईल. सकाळी ८ वाजता नंदीध्वज व पालखीची गावातून मिरवणूक निघेल, त्यानंतर दहीहंडी कार्यक्रम होणार आहे. सकाळी ९ वाजता कर्नाटकातील सुप्रसिद्ध ढोलकी कार्यक्रम रंगणार असून, सुचित्रा बसनाळ, अमोघ सिद्ध गायन संघ (बसनाळ, ता. इंडी) तसेच सखुबाई यांच्या महाळिंगराया गायन संघ (शिरकनळी, ता. इंडी) यांचे सादरीकरण होईल. रात्री ८ वाजता प्रवचन होणार आहे.
शुक्रवार, ३ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता कलगीतुरांईचे सवाल-जवाब गाणे दुपारी ४ वाजेपर्यंत चालणार आहे. सायंकाळी ७ वाजता शोभेचे दारूकाम आणि रात्री ८ वाजता ‘आध्यात्मिक जीवन’ या विषयावर प्रवचन होईल. रात्री १० वाजता गुरु चंद्रशेखर मुखबधिर शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे.
शनिवार, ४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता अमोघ सिद्ध गायन संघ (चडचण) व महालिंगराया गायन संघ (जमखंडी) यांचे ढोलकी कार्यक्रम होतील. दुपारी ४ वाजता तालुक्यातील नामवंत मल्लांच्या जंगी कुस्त्यांचा फड रंगणार आहे. रात्री १० वाजता “माता तप्पीदा मैदन… अर्थात देवरहंता अण्णा” हे कन्नड नाटक सादर होणार आहे.
यात्रेदरम्यान दररोज रात्री ८ वाजता महातेंश हिरेमठ महास्वामीजी (तद्देवाडी) यांचे आध्यात्मिक प्रवचन होणार आहे. तसेच चारही दिवस भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
यात्रा कमिटीने सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मंगलमय सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!

0 Comments