Advertisement

Breaking News
Loading...

“धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याच्या चिमणीवर चढून आंदोलन करणार अनिल पाटील; ऊस बिल थकबाकीवरून शेतकऱ्यांचा संताप!”...

 


मोहोळ / हॅलो रिपोर्टर न्यूज / मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : सन 2025-26 च्या गळीत हंगामात गोकुळ शुगर धोत्री या साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची ऊस बिले थकीत ठेवल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर डिजिटल शेतकरी संघटना, शिरापूर (सो) चे संस्थापक अध्यक्ष अनिल अबाजी पाटील यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.

संघटनेच्या वतीने साखर आयुक्तालय पुणे, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. नियमानुसार ऊस गळीतास गेल्यानंतर 14 दिवसांत पहिला हप्ता देणे बंधनकारक असतानाही कारखान्याकडून अद्याप एफ.आर.पी.नुसार पैसे देण्यात आलेले नाहीत, असा आरोप करण्यात आला आहे.

ऊस बिल न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे बँक व पतसंस्थांचे कर्ज वाढत असून, अनेकांचे सिव्हिल स्कोअर खराब होत आहेत. तसेच मुलींच्या लग्नांसह इतर खर्चांसाठी शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

यावर उपाय न झाल्यास, दिनांक 02 एप्रिल 2026 रोजी गोकुळ शुगर धोत्री कारखान्याच्या चिमणीवर चढून आंदोलन करणार, असा स्पष्ट इशारा अनिल पाटील यांनी दिला आहे. आंदोलनावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणीही करण्यात आली आहे.

या इशाऱ्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, प्रशासन व कारखाना व्यवस्थापन यावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!


Post a Comment

0 Comments