सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | डॉ. राजदत्त रासोलगीकर : महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्ष दिनानिमित्त सोलापुरातील सुपर मार्केट परिसरातील त्यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर सर तसेच राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड सर यांच्या हस्ते हा अभिवादन सोहळा पार पडला.
कार्यक्रमाला महासंघाचे इतर पदाधिकारी, सभासद व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महात्मा फुले यांच्या समाजप्रबोधन, शिक्षण प्रसार आणि समतेच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!

0 Comments