Advertisement

Breaking News
Loading...

🌞 मनाच्या गाभाऱ्यातून..! 'रविवारचा चहा' सदर म्हणजे मराठी कथांचा गुलदस्ता प्रा. दिलीप जाधव सर यांच्या वाढदिवसानिमित्त रवी देवकर यांनी दिलेल्या शब्दशुभेच्छा...

 


🌞 मनाच्या गाभाऱ्यातून..!

'रविवारचा चहा' सदर म्हणजे मराठी कथांचा गुलदस्ता

प्रा. दिलीप जाधव सर यांच्या वाढदिवसानिमित्त रवी देवकर यांनी दिलेल्या शब्दशुभेच्छा...

प्रा. दिलीप जाधव सर यांचे 'रविवारचा चहा' या 210 लेखमाला मी अत्यंत श्रद्धापूर्वक वाचून प्रकाशित केले. प्रत्येक रविवारच्या सोशल मीडियावरची वाट पाहण्याचा एक छंदच माझ्यासह इतर वाचकांना जडला आहे. जाधव सरांनी अत्यंत ओघवत्या शैलीत व अभिनिवेश मुक्त विविध व्यवहारांवर अभ्यासपूर्ण मते मांडली आहेत. सर्वच लेखात सखोल, तपशील लेख लिहिण्यामध्ये घेतलेले विशेष परिश्रम ठळकपणे दृष्टोत्पत्तीस येतात. ज्या सविस्तर पद्धतीने ते सदरातल्या लेखातून माहिती देतात ती खूपच महत्त्वपूर्ण असते. त्यामुळे 'रविवारचा चहा' म्हणजे विविध माहितीचा खजिनाच झाला आहे.

सरांच्या लिखाणामध्ये, साहित्यामध्ये वाचक निर्माण करण्याची शक्ती आहे. किंबहुना हे लेख जीवनदायी झाले आहे. माणसाला जिवंत करणारी, नवनवीन कल्पनेची निर्मिती हे आपल्या लेखातून होत आहे. लेखातील भाषा प्रत्यक्ष ताजे, टवटवीत वाटतात. एकूणच विचार करायला लावणाऱ्या या कथा असल्याने  'रविवारचा चहा' हे सदर मराठी कथांचा जणू  गुलदस्ता वाटतो.

आपल्या या सदरातून सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिवर्तनासाठी 'माध्यम' म्हणून उपयोग करून उदंड कार्य उभे करणाऱ्या साहित्यिकांच्या मांदियाळीत समृद्ध तेजस्वी वारसा चालवणारे जे मोजके साहित्यिक आपल्याला दिसतात त्यामध्ये 'रविवारचा चहा' कार... प्रा. दिलीप जाधव सर यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. यापुढील काळातही आपल्या हातून निरंतर उत्कृष्ट लेखन व्हावे, यासाठी आपणास आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो. अशी 51 फूट हनुमानगड चरणी सदिच्छा.. आणि आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..🍵🍵

               ✍️ रवि देवकर 




Post a Comment

0 Comments