पंढरपूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 693/2026, भारतीय न्याय संहिता कलम 103 अन्वये 18 नोव्हेंबर 2026 रोजी दाखल झालेल्या खून प्रकरणाचा सोलापूर ग्रामीण पोलिसांनी उलगडा केला आहे. अज्ञात आरोपींनी अग्निशस्त्रातून गोळीबार करून एका व्यक्तीची हत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास करून सोलापूर ग्रामीण पोलिसांनी आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली. या संपूर्ण तपासाची माहिती पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत दिली.


0 Comments