मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे | दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या अभिनव उपक्रमांतर्गत लोकसेवा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, मंद्रूप येथील दोन गुणवंत विद्यार्थ्यांची एक दिवसाचे प्रतिकात्मक सरपंच म्हणून निवड करण्यात आली आहे. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या ओजस रामचंद्र हुक्केरी याची येळेगाव ग्रामपंचायतीच्या प्रतिकात्मक सरपंचपदी, तर रोहिणी शिवानंद कुंभार हिची मंद्रूप ग्रामपंचायतीच्या प्रतिकात्मक सरपंचपदी निवड झाली आहे.
"आजचा विद्यार्थी उद्याचा लोकप्रतिनिधी" या संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान 4 जून 2026 रोजी करण्यात येणार असून, त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या आहेत.







0 Comments