Advertisement

Breaking News
Loading...

17 वर्षीय मुलीचा अज्ञात कारणावरुन गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न


दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथे भुवनेश्वरी आमसिद्ध कोळी (वय वर्षे १७),रा.निंबर्गी,ता.द.सोलापूर या मुलीने राहत्या अज्ञात कारणावरुन घरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.तिला गळफास घेत असताना पाहून शेजाऱ्यांनी तात्काळ खाली उतरवले.तिला मंद्रुप येथील ग्रामीण शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करवून पुढील उपचारासाठी भाऊ सुनील कोळी यांनी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.रुग्ण शुध्दीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हाॅस्पिटल पोलिस चौकीत झाल्याची माहिती मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments