Advertisement

Breaking News
Loading...

चक्क मालट्रकच गेली चोरीला

अज्ञात चोरट्याने तेरामैल (बसवनगर) येथील वैष्णवी हॉटेल समोरून चक्क खताने भरलेली अशोक लेलंड कंपनीची मालट्रक त्याठा क्रंमाक KA 23 B 2198 चोरून नेल्याची घटना घडली आहे.अब्दुलसाब गूडुसाब मुल्ला (वय 50 वर्षे, रा.विजयापुरा) यांनी मंद्रूप पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीने सोमवारी २१ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास  बसवनगर,येथील वैष्णवी हॉटेल जवळ जेवण्यासाठी उभारले असता रोडच्या

ट्रक चोरीला


कडेला त्यांची खताने भरलेली मालट्रक पार्क करून ठेवली होती.कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता मुद्दाम,लबाडीने फिर्यादीच्या संमती शिवाय चोरून नेली आहे.अज्ञात आरोपी विरोधात भारतीय दंड विधान कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


यावेळी सदरचे वाहन दिसल्यास मंद्रूप पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मंद्रूपचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले,पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments