Advertisement

Breaking News
Loading...

आचेगाव येथे चुल पेटवताना साडीला लागली आग लागू, महिला जखमी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव येथे सुरेखा देवाप्पा पाटील (वय वर्ष 41),राहणार आचेगाव,तालुका दक्षिण सोलापूर या दिनांक 22 ऑगस्ट रोजी 2023 रोजी राहत्या घरात चुल पेटवत असताना चुलीतील आग साडीला लागून त्यात त्यांचा उजवा पाय जळाला.तदनंतर शहरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांनी उपचार घेतला.दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी त्यांचा जळालेला पाय दुखत असल्याने त्यांना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास उपचारासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात मुलगा धानप्पा पाटील यांनी दाखल केले.रुग्ण शुद्धीवर असून सादर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments