Advertisement

Breaking News
Loading...

व्होनमुर्गी फाटा येथे ट्रकने धडक दिल्याने एक इसम गंभीर जखमी


दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गी फाटा येथे दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण कोळी (वय वर्ष 50),राहणार सोलापूर यांना ट्रक त्याचा क्रमांक टीएन 88 वाय 3873 या ट्रकने समोरुन धडक दिली.या धडकेत लक्ष्मण कोळी यांच्या डोक्याला मार लागून जखम झाल्याने त्यांना दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास 1033 नांदणी टोलनाक्याचे डॉक्टर बाळाप्पा मेटे यांनी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले.रुग्ण शुद्धीवर असून सादर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....


Post a Comment

0 Comments