Advertisement

Breaking News
Loading...

लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर केले दुष्कर्म

वी


ज मीटर बसविण्याच्या निमित्ताने तरुणीशी ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.याबाबत तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून मुकुंद दत्तात्रय भगरे (वय ३०,रा.अकोले मंद्रूप, ता.द.सोलापूर) याच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.यातील पीडित तरुणी ही एका खासगी ठिकाणी नोकरीस आहे.तिच्या घरी मीटर बसविण्यासाठी वायरमन मुकुंद भगरे आला होता.त्याने कामासाठी पीडितेचा मोबाइल नंबर घेतला.पुढे ओळख वाढवून आपले लग्न झाले नाही म्हणून लग्नाची मागणी घातली.पुढे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.तुळजापूरला दर्शनाला जाण्याच्या निमित्ताने एका हॉटेलमध्ये,सावळेश्वरजवळ एका हॉटेल तसेच विविध ठिकाणी त्याने तिच्यावर अत्याचार केला.लग्नासाठी विचारणा करीत असताना आरोपीने टाळाटाळ सुरू केली.पीडितेने आरोपीच्या घरी जाऊन चौकशी केली असता तो विवाहित असल्याचे समजले.त्यानंतर तिने आरोपी विरुध्द पोलिसात फिर्याद दिली.

Post a Comment

0 Comments