Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

२४ तासाच्या आत चोरीस गेलेली मालट्रक आरोपीसह ताब्यात



दि.२२ आँगस्ट २०२३ रोजी मालट्रक चालक अब्दुलसाब गुड्डुसाब मुल्ला (रा.कमान नगर,बबलेश्वर रोड,विजापूर) तसेच महबुब सत्तारसाव रोठा,(रा.विजापूर) हे मालट्रक त्याचा कमांक के.जे.२३ बी. २१९८ यामध्ये डीएनपी खतीची ५८० पोती घेवून विजापुर ते नागपूर कडे जात असतांना रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मंद्रूप पोलीस ठाणे हद्दीत १३ मैल बसवनगर येथील वैष्णवी ढाबा येथे मालट्रक रोडच्या कडेला लावून जेवणकरणेसाठी गेले होते.अज्ञाताने १५ लाख रुपये किंमतीची माल ट्रक व त्यातील असलेले ७ लाख ५० हजार रुपये किंमतीचे डी.एन.पी.खताचे ५८० पोते मालाची व १२ हजार किंमतीची ताडपत्री असा एकून २२ लाख ६२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेलाम्हणून चालक मुल्ला यांनी मंद्रूप पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.


पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे व गुन्हे प्रकटीकरण शाखये पोलीस अमलदार यांनी मंद्रूप व परिसरात तात्काळ गुन्हयाचा तपास सुरू करून चोरी गेलेले वाहन कोणत्या दिशेने गेले याबाबत नांदणी,इंचगाव,तामलवाडी,सावळेश्वर व वरवडे टोलनाका येथे प्रत्यक्ष जावून सी.सी.टी.व्ही.फुटेज व गुन्हयातील संशयित वाहनाची तपासणी केली.तपासात सदर मालट्रक इंचगाव टोलनाका येथे जात असल्याची गुप्त बातमीदाराच्या मार्फत बातमी मिळाल्याने त्याचा पाठलाग करत असताना कामती पोलीस ठाण्याचे एपीआय दुषणे व त्यांच्या पथकाच्या मदतीने सदरचे वाहन रात्री 11 वाजता पकडले.


सदर आरोपींकडे चौकशी केली असता समीर अल्लाउद्दीन मुल्ला (वय ४५ वर्षे),रा.तेलगांव भिमा,ता.दक्षिण सोलापुर हल्ली रा.विटलाई कॉलनी,इचगांव,कोल्हापूर,दिपक बिप्पा कोळी(वय ३० वर्षे)रा.तेलगांव भिमा,ता.दक्षिण सोलापूरर असे असल्याचे सांगीतले.या दोन्ही आरोपींचा गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या ताब्यातून गुन्हयातील चोरीस गेलेली १५ लाख रुपये किंमतीची माल ट्रक,मालट्रक मधील ७ लाख ५० हजार रुपये खताचे पोते,तसेच १२ हजार किंमतीची ताडपत्री असा एकून २२ लाख ६२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात येवून आरोपींना अटक करण्यात आली आहे.


सदरचा गुन्ह्याची उकल २४ तासाचे आत उघडकीस आणली असुन सदर गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे हे करत आहेत.


सदरची कामगीरी हि पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव,उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती,सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अमितकुमार करपे,सपोफी संदीप काशीद,पोलीस अंमलदार अविनाश पाटील,अंकुश मोरे,श्रीकांत घुटने,संदीप काळे,दिनेश पवार,सागर चव्हाण यांनी बजावली आहे.

ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी...

Post a Comment

0 Comments