Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांंनी केली 'ही' मागणी

अक्कलकोट


व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे ठरणाऱ्या एकरुख योजनेच्या माध्यमातून उजनीचे पाणी कुरनूर धरणात यावे.यासाठी गेल्या दोन दशकांपासून वैयक्तिक पाठपुरावा सुरू आहे.वेळोवेळी सत्तेतील मंत्र्यांचे सहकार्य मिळवत ही योजना अंतिम टप्प्यात आणली आहे.सद्यस्थितीत अनेक दिवसांपासून पावसात मोठा खंड पडल्याने अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील खरीप पिकांसह ऊसाचे पीक अडचणीत सापडले आहे.उभे पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत करपुन चालले आहेत.भविष्यातील पिकांच्या नियोजनासाठी एकरुख योजनेचे पाणी लाखमोलाचे ठरणार आहे.म्हणुन उजनीचे हक्काचे असणारे एकरुख योजनेचे पाणी हिप्परगा तलावातुन तात्काळ कुरनूर धरणात सोडण्यासंदर्भात प्रशासन स्तरावरुन आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.


अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील बहुतांश शेतकरी खरीप हंगामातील पिकांवर अवलंबून असतात.संपुर्ण वर्षाचे अर्थकारण हे पुर्णतः खरीप हंगामातील तुर,सोयाबीन,मुग,उडीद,भुईमुग यांसह इतर पिकांवर अवलंबून असते.मात्र पावसात पडलेल्या मोठ्या खंडामुळे खरीपातील सर्व पिके जळुन चालली आहेत.ही पिके गेल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.त्यांना शासकीय स्तरावरून आर्थिक मदत मिळण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही.प्राप्त परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी पिकांच्या जोखमेपोटी खरीप हंगाम २०२३ साठी पीकविमा योजनेत सहभाग घेतला आहे.याला अनुसरून शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम दिवाळीपुर्वी मिळावी यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.तसेच विमा उतरवलेल्या सर्व शेतकऱ्यांना जोखमेपोटी(१०० टक्के नुकसान ग्राह्य धरुन) पीक विम्याची पुर्ण रक्कमदेखील मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही आपल्या स्तरावरुन करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान रक्कम देण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली.मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून सदर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही.कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने आधीच शेतकरी अडचणीत आले असताना आता पावसाच्या लहरीपणाने त्यात भर पडली आहे.म्हणुन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आधार मिळावा यासाठी अनुदानाची रक्कम तातडीने खात्यात जमा करण्यात यावी.मागील वर्षी राज्य सरकारने घोषित केलेल्या अतिवृष्टीची रक्कमदेखील कित्येक शेतकऱ्यांना मिळाली नाही.सदरची रक्कमदेखील बाधित शेतकऱ्यांना वितरित करण्याची मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे,मुस्तीचे सरपंच नागराज पाटील,पद्मश्री पाटील,राहुल चौधरी,गौरीशंकर स्वामी,तुकाराम कोळेकर,विठ्ठल हरके,अनिल देवकर,लक्ष्मण जाधव,विठ्ठल मिटकरी,चंद्रकांत चव्हाण,राम चौगुले,राजू वाडकर,उद्धव जाधव,बाबुराव चव्हाण,बसव तरंगे,सुनील देवकर,सचिन माळी,ज्ञानेश्वर मळगे,लिंगराज पाटील,भीमाशंकर विभुते,अर्जुन घंटे,सज्जन पाटील,गणेश काकडे,सिद्धार्थ गायकवाड,सोमनाथ चिकवडे,सरदार शेख,शरणाप्पा चौधरी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments