Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

निंबर्गीच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी चंद्रकांत बिराजदार यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड

दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत बिराजदार यांची सर्वानुमते दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली.निंबर्गी ग्रामपंचायत कार्यालयात नुकतीच सरपंच श्रीदिप सुरेश हसापुरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली.या ग्रामसभेत तंटामुक्त समिती अध्यक्षपदी चंद्रकांत बिराजदार यांची सर्वानुमते सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली.


यावेळी माजी पोलीस पाटील शंकराराव पाटील,माजी उपसरपंच अरुणकुमार बिराजदार,गंगाधर बिराजदार,उपसरपंच पिरसाब हवालदार,पोलीस पाटील सिद्रामप्पा बिराजदार,सोमशंकर बिराजदार,येदा दुपारगुडे,जगदेव ककमारे,अप्पासाहेब माने,कल्याणी शिरगोंडे,इरेशा कोळी,आप्पासाहेब बिराजदार पाटील,जगदेव स्वड्डी,इलाई मुल्ला,आप्पासाहेब खूने,महादेव फुलारी,मिलिंद पाटील,महादेव बनसोडे,दिनेश भालेकर,नागेश स्वामी,ग्रामसेवक नागेश जोडमोटे,कृषी अधिकारी अशोक राठोड,पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सत्यजित पाटील,बसवराज स्वामी यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments