अंत्रोळी | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | गावाच्या विकासासोबतच स्वच्छतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने अंत्रोळी गावात ‘एक रविवार गावासाठी’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपक्रमाच्या पहिल्याच रविवारी श्री चौमुखी हनुमान मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत गावातील तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मंदिर परिसराची स्वच्छता केली. तरुणाईच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे गावात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण होत असून, ग्रामस्थांमधून या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.
या उपक्रमाची संकल्पना युवा नेतृत्व बिरू शिंदे व ग्रामपंचायत अधिकारी गणेश फडतरे यांची असून, माजी सरपंच जितेंद्र थोरात व भाऊराव बेलदार यांचे मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमासाठी बिरा थोरात, माजी उपसरपंच मजनोद्दीन पठाण, नागेश कोळी, संजू कोळी, श्रेयश बेलदार यांच्यासह इतर ग्रामस्थांनी सहकार्य केले. यावेळी तरुणांसोबतच ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग घेतला.
‘आपले गाव, आपली जबाबदारी’ या भावनेतून प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसराची स्वच्छता राखण्यासाठी पुढाकार घ्यावा, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.




0 Comments