Advertisement

Breaking News
Loading...

हातभट्टी दारुची विक्री करणार्‍या दिव्यांग महिलेवर गुन्हा दाखल

फिर्यादी मपोकाँ दिक्षीता दोडतले यांनी मंद्रुप पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार दि.14 सप्टेबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सादेपुर ते लवंगी जाणार्‍या रोडवर चहा टपरीच्या आडोशाला दिव्यांग महीला आरोपी गुजाबाई धोंडप्पा वाघमारे (वय 36 वर्ष),राहणार सादेपुर,ता.द.सोलापूर हीने तीच्या ताब्यात विनापरवा बेकायदेशीररित्या एक प्लॅस्टिक कॅन्डसह 10 ली हातभट्टी दारु त्याची किंमत 510 रु किंमतीचा प्रोव्हीशन माल विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या परिस्थितीत मिळुन आली आहे.म्हणुन तिच्या विरुध्द मुबंई प्रोव्ही अॅक्ट 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे,पुढील तपास पोलीस हवालदार गुंडाळे हे करीत असल्याची माहिती शनिवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments