Advertisement

Breaking News
Loading...

आर्थिक देवाण-घेवाणीवरून लोखंडी सळई व लाकडाने मारहाण

  दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल येथे आर्थिक देवाण-घेवाणीवरून शिवानंद शंकर न्हावी (वय वर्षे ४०,रा.हत्तरसंग कुडल,ता.द.सोलापूर) या तरुणास बापू गायकवाड याने लोखंडी सळई व लाकडाने मारहाण केली.यात त्याच्या सर्वांगास मुकामार लागून जखमी झाला.त्याला मंद्रूप येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करवून तेथील डाॅक्टरांच्या सल्याने सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले.रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हाॅस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती शनिवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments