Advertisement

Breaking News
Loading...

फताटेवाडी येथील एनटीपीसी मध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा

कार्यालयीन कामकाजात तसेच दैनंदिन राज्यभाषा हिंदीचा व्यापक प्रसार करण्याचा उद्देशाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी येथे गुरुवारी हिंदी दिवसाचे उद्घाटन एनटीपीसीचे व्यवस्थापक विजय गोयल यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.यावेळी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रत्येकाला त्याच्या दैनंदिन कार्यालयीन कामकाजात शक्य तितकी अधिकृत भाषा हिंदी वापराण्यास सांगताना गोयल म्हणाले हिंदी भाषेमध्ये सर्व भाषांना एकत्र जोडण्याची अफाट शक्ती आणि ताकद असल्याचे ते म्हणाले.पंधरवड्या दरम्यान हिंदी प्रश्नमंजुषा,घोषणा लेखन,निबंध लेखन,चित्रकला स्पर्धा आदी स्पर्धांचा आयोजन करण्यात येणार आहे.या पंधरवड्याची सांगता 29 सप्टेंबर 2023 रोजी पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाने करण्यात येणार आहे

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments