Advertisement

Breaking News
Loading...

कल्याण मटका जुगार, एकावर वळसंग पोलिसात गुन्हा दाखल

फिर्यादी पोकॉ धरेप्पा व्हनमोरे (वय 28 वर्ष) यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दि.14 सप्टेबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ब विभाग विडी घरकुल,कुंभारी,ता.द.सोलापूर येथील पञ्याशेडच्या आडोशाला आरोपी हासन अहमदअली शेख (वय 37 वर्षे ),रा.ब विभाग विडी घरकुल,कुंभारी,ता.द.सोलापूर हा चोरून येणार्‍या जाणार्‍या लोकांकडून पैशाची पैज लावून कल्याण नवाचा मटका लिहून घेत असताना रोख रक्कम 480/- रुपये व चिठ्ठीसह मिळुन आला आहे.म्हणुन त्याच्याविरूध्द महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12अ प्रमाणे वळसंग पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ कुंवर हे करीत असल्याची माहिती शुक्रवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments