Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

वडिलांसह मुलाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण


सोलापूर शहरातील सिध्देश्वर पेठ येथे वडिलांसह मुलाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली आहे.मोहम्मद युसुफ चांद साहब (वय वर्ष 49),राहणार नई जिंदगी आणि त्यांचा मुलगा मोहम्मद इलियास शेख (वय वर्ष 17) असे मारहाणीत जखमी झालेल्यांची नावे आहेत.ही घटना शनिवार,दि.16 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास सिद्धेश्वर पेठ येथे घडली असून जखमी मोहम्मद शेख यांचे भंगारचे दुकान सिद्धेश्वर पेठ येथे आहे.दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांकडून तुम्ही भंगार का घेता,ते तुम्ही घ्यायचे नाही,मीच घेणार असे दमदाटी करत हसन उर्फ अक्रम पैलवान (वय वर्ष 45),राहणार सिद्धेश्वर पेठ व त्याचा मुलगा सौद पैलवान या दोघांनी जवळच असलेल्या लोखंडी रॉडने मारहाण करून,मी तुम्हाला बघून घेतो,माझी ओळख खूप आहे,माझ्याकडे भरपूर पैसा आहे,तुम्हाला जिवंत सोडणार नाही,अशी धमकीही दिल्याचा आरोप जखमी मोहम्मद शेख यांनी केला आहे.


या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


याबाबत अधिक माहिती जखमी मोहम्मद युसुफ चांद साहब व त्याच्या मुलाने पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....


Post a Comment

0 Comments