Advertisement

Breaking News
Loading...

धोत्री येथे विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

माहेरहून लग्नात राहिलेले अर्धा तोळे सोने आणि दोन लाख रुपये घेऊन ये म्हणत विवाहितेल हाकलून दिले.याप्रकरणी जोडभावी पेठ पोलिसांत पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.२३ मे ते १४ जुलै २०२३ दरम्यान हा प्रकार घडल्याची फिर्याद देण्यात आली आहे.पती किरण शिवानंद रणधरे,सासू गौराबाई,दीर संदीप आणि संतोष (सर्वजण रा.धोत्री,ता.दक्षिण सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल आहे.याबाबत निशा किरण रणधरे (वय २१,रा.मड्डी वस्ती,भवानी पेठ,सोलापूर) यांनी जोडभावी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.अधिक तपास जोडभावी पोलीस करीत असल्याची माहिती शनिवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments