Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर मंद्रूप पोलीसात गुन्हा दाखल

दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका गावातील शेतात कामाला आलेल्या मागासवर्गीय महिलेचा पाणी आणण्याच्या बहाण्याने ओढाओढी करून विनयभंग केल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.


याबाबत मंद्रूप पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,सदर महिला संबंधित गावाजवळ असलेल्या शेतात इतर महिला सोबत गुरुवारी सकाळी दहा वाजता कामाला गेली होती.सर्व महिलांसोबत तीही शेतात खुरपणीचे काम करीत होती.त्यावेळी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास आरोपी हा तेथे आला.त्यांनी पत्र्याचे शेड मधील पाणी पिण्यासाठी आणण्यास त्या महिलेस सांगितले.सदर पीडित महिला पाणी आणण्यासाठी गेली तेव्हा शेडला बाहेरून कडी होती.कढी काढून देण्याच्या बहाण्याने आरोपी तेथे आला.शेडच्या दरवाजाची कडी काढून दिली.पाण्याची आतील घागर आणण्यास गेले असता पाठीमागून येऊन त्याने या महिलेस झोंबाझोंबी केली.त्या महिलेने घाबरून आरडाओरडा केली.तेव्हा कोणाला सांगितलं तर खलास करु,अशी धमकी त्याने दिली.त्यानंतर ही महिला घाबरून नातेवाईक आणि महिलांसह घरी आली.त्यानंतर पतीसोबत येवून मंद्रुप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.त्यानुसार सदर आरोपी विरुध्द भादवि कलम ३५४,३५४अ, ५०६ व अनुसूचित जाती,जमाती अत्याचार प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती हे करीत असल्याची माहिती शनिवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments