Advertisement

Breaking News
Loading...

मोबाईल घेऊन न दिल्याने विद्यार्थ्यांने संपवले जीवन

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर येथील बारावीत शिकणाऱ्या एका तरुणाने आई-वडिलांनी मोबाईल घेऊन न दिल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.आकाश राजकुमार पुजारी (वय वर्षे १८),राहणार कुसुर (तालुका दक्षिण सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत मंद्रूप पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,आकाश पुजारी हा मंद्रूप येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावी मध्ये शिकत होता.तो आपल्या आई वडिलांना सतत मोबाईल घेऊन द्या,अशी मागणी करायचा.मात्र घरची आर्थिक परिस्थिती नसल्याने आई-वडिलांनी मोबाईल घेऊन दिला नाही.मोबाईल वरून तो घरात आई-वडिलांशी वाद घालायचा.शुक्रवारी रात्री उशिराने तो घरी आला.आई वडील झोपल्यानंतर त्याने घरापासून जवळच असलेल्या आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला.शनिवारी सकाळी आई-वडिलांनी शोध घेतला असता तो शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.त्यानंतर मंद्रूप पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात मृत तरुणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.सदर घटनेची नोंद मंद्रूप पोलीस ठाण्यात झाल्याची माहिती रविवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments