Advertisement

Breaking News
Loading...

डोणगाव रस्त्यावरील एअरटेल टॉवरमधून ४० हजार रुपये किंमतीच्या साहित्याची चोरी

दक्षिण मतदारसंघातील डोणगाव रस्त्यावर असलेल्या इंडस टॉवर क्रमांक १३८२२८७ वरील एअरटेल बीटीएसमधून ४० हजार रुपये किंमतीच्या साहित्याची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी इलियास अब्दुल लतीफ टिनवाला यांनी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द तक्रार दाखल केली आहे.या टॉवरमधून ४० हजार रुपये किमतीचे एटीआयओचे दोन कार्ड चोरट्यांनी चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.अधिक तपास सलगर वस्ती पोलीस करीत असल्याची माहिती गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments