Advertisement

Breaking News
Loading...

आहेरवाडी येथे भांडण का बघतो म्हणून एकाचे दगडाने डोके फोडले

दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथे भांडण बघत असताना भांडण का बघतो,असे म्हणून तरुणास दगडाने बेदम मारहाण करून डोके फोडले.ही घटना आहेरवाडी येथे १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली.नागनाथ रेवप्पा बोरेगाव (वय वर्षे ४२,रा.आहेरवाडी,ता.द.सोलापूर) असे जखमी

तरुणाचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,आहेरवाडी गावात पंचलिंगेश्वर मंदिराजवळ भांडण चालू होते.ते नागनाथ बोरेगाव हे बघत थांबले होते.याचवेळी आमचे भांडण का बघतो म्हणून विराट श्रीमंत सासवे याने नागनाथ बोरगाव यांना दगडाने मारहाण करून डोके फोडले.वळसंग येथील शासकीय रुग्णालयात उपचार करवून रेफरने पुढील उपचारासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात भाऊ योगीनाथ बोरेगाव यांनी दाखल केले.रुग्ण शुध्दीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल व्हाॅस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments