Advertisement

Breaking News
Loading...

अनोळखी इसमाच्या मृतदेहाचे कुत्र्याने तोडले लचके


मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला कुत्रे काहीतरी खात असल्याचे दिसल्याने त्याने जवळ जाऊन पाहिले असता एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील शेतकरी मनोहर दिगंबर चव्हाण हे शेतामध्ये नेहमीप्रमाणे पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना शेजारील बबन चव्हाण यांच्या शेतात कुत्रे काहीतरी खात असल्याचे दिसले.त्यावेळी जवळ जाऊन

पाहिले असता पुरुष जातींचे अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

दिसला.यासंदर्भात त्यांनी तत्काळ मोहोळ पोलीस ठाण्यात माहिती दिली असून पोलिसांनी खबर नोंदवून घेतली आहे.या अनोळखी व्यक्तीबाबत चौकशी सुरू केली आहे,अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लोबू चव्हाण हे करीत असल्याची माहिती मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments