Advertisement

Breaking News
Loading...

होटगी स्टेशन ते औज दरम्यान मद्यधुंद अवस्थेत बल्कर चालवणार्‍या चालकावर गुन्हा दाखल

फिर्यादी पोकाँ रोहीत थोरात यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी स्टेशन ते औंज दरम्यान पेट्रोलिंग करित असताना अडखळत अडखळत शिवानंद गोलप्पा देसाई (वय 44 वर्षे), रा सिंदगी ता विजयपुर,राज्य कर्नाटक हा मद्यधुंद अवस्थेत आपल्या ताब्यातील बल्कर त्याचा क्रमांक केए 28 एए 2140 यावर झिंगलेल्या आवस्थेत वेडी वाकडी चालवित असताना मिळुन आलेला आहे.म्हणून सदर चालका विरुध्द मोटार वाहन कायदा कलम 185 प्रमाणे वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस हवालदार बिराजदार हे करीत असल्याची माहिती गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments