Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

कर्जाच्या व्याजापोटी तगादा लावून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

फिर्यादी अस्मिता नितीन आतकरे (वय 39),रा.देगाव वाळूज,तालुका मोहोळ,सध्या राहणार पालखी मार्ग,मोहोळ यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार सुमारे दोन वर्षों पासुन ते दिनांक २८ आँगस्ट २०२३ रोजीच्या दरम्यान आरोपी रामचंद्र धोंडीबा चंदनशिवे रा.इसबावी,पंढरपुर यांने वारंवार फिर्यादीच्या पतिस व्याजाने दिलेल्या पैशाच्या कारणावरून त्रास देवुन व पैसे परत नाही केल्यास फिर्यादीच्या नव-या विरोधात पेट्रोल पंपावर अफरातफर केली म्हणुन अफरातफरीचा व अट्रासिटीचा गुन्हा नोंद करणार आहे.यातुन तुम्हाला सुटायचे असल्यास तुमच्या नावावरील जमीन मला खरेदी दया असा तगादा लावला.दिनांक २३ आँगस्ट २०२३ रोजी फिर्यादीच्या नावावरील शेतजमीन खरेदी देवुनही आणखी पैसे व व्याज देणे असून तुझ्या नावावरील जमीन मला खरेदी दे असा तगादा लावल्यामुळे फिर्यादीच्या नव-याने त्याच तणावामध्ये दिनांक २९ आँगस्ट २०२३ रोजी सकाळी ०७:३० वाजण्याच्यापुर्वी सोलापुर-पुणे हायवे रोडलगत असलेल्या कोठारी पाईप्स कंपनीचे जवळ विष प्राशन करून स्वतः आत्महत्या केली आहे,त्यांच्या आत्महत्येस आरोपी रामचंद्र धोंडीबा चंदनशिवे व रोहिणी रामचंद्र चंदनशिवे दोघे रा.इसबाबी,पंढरपुर हेच जबाबदार असल्याची फिर्याद दिली.दिलेल्या फिर्यादीनुसार दोन्ही आरोपींविरुध्द भादवि कलम ३०६,३४ तसेच महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमानुसार मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सपोनि झालटे हे करीत असल्याची माहिती गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments