Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

औरंगाबाद खंडपीठाकडून जलद आणि ऐतिहासिक निर्णय

अर्जदार ऋतुजा दीपक वाघ,राहणार लळीग,जि.धुळे यांचे ठाकूर जमातीचे प्रकरण धुळे जात पडताळणी समितीने खालील मुद्यांवर अवैध ठरवले होते.


1) अर्जदाराच्या घरात देण्यात आलेल्या 5 वैधता प्रमाणपत्र या पूर्वीच समितीने रद्द केल्या आहेत.

2) रक्तनात्यातील 6 जणांचे जात प्रमाणपत्र या पूर्वीच अवैध ठरवण्यात आले आहेत.

3) अर्जदाराच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांकडे वैधता प्रमाणपत्र नाही.

4) स्वातंत्र्यापूर्वीच्या शालेय नोंदी मध्ये भाट नोंद आहे.

5) अर्जदाराचा रहिवास आदिवासी क्षेत्रातील नाही.

6) अर्जदार यास ठाकूर अनुसूचित जमाती बद्दल अप्तभाव नाही.


वरील आदेशा विरुद्ध अर्जदार यांनी जेष्ठ विधिज्ञ ॲड.सुशांत येरमवार साहेब यांच्या मार्फत 20 सप्टेबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता प्रकरण मा.न्यायालयात दाखल केले.मा.न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य आणि गरज लक्षात घेऊन तात्काळ दुपारी 2:30 वाजता सुनावाणीसाठी ठेवले.वरील सर्व बाबींचा योग्य आणि अभ्यासपूर्ण युक्तीवाद करून मा.न्यायालयाकडून तात्काळ विना अट,विना शर्त वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिनांक 20 सप्टेबर 2023 दुपारी 4:00 वाजता पारित करण्यात आले.


या जलद आणि ऐतिहासिक निर्णया बद्दल ॲड.सुशांत येरमवार साहेब ( 98230 99140 ) आणि अर्जदार ऋतुजा वाघ यांचे मनःपूर्वक अभिनंदन...!


Post a Comment

0 Comments