Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

अर्जूनसोंड येथे दारुधंद्याविरुध्द तक्रार केली म्हणून काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षाला बेदम मारहाण

मोहोळ तालुक्यातील अर्जुन सोंड येथील भाजप ग्रामपंचायत सदस्या सह ४ जणांनी मिळून काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष सुरेश प्रभाकर हावळे यांना काठीने,चाकूने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.


याप्रकरणी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.अर्जुन सोंड ग्रामपंचायतीचे भाजपचे सदस्य युवराज शिवराम ढेरे ,धनाजी ढेरे,शिवराम ढेरे,बापू ढेरे,गोरख ढेरे या पाच जणांनी सुरेश हावळे यांना मारहाण केली आहे.या प्रकरणी सिविल पोलीस चौकीत या पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे.


20 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता अर्जुन सोंड फाट्याजवळ सुरेश हावळे यांना ही मारहाण झाल्याची तक्रार आहे.तक्रारदार सुरेश हावळे हे काँग्रेसचे निराधार समितीचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत.अर्जूनसोंड फाट्याजवळ सुरू असलेल्या दारू धंद्याविरुद्ध त्यांनी तक्रार केली होती.तसेच गावात काँग्रेसची पदयात्रा काढली होती.त्याचा राग मनात धरून भाजप ग्रामपंचायत सदस्य युवराज ढेरे व त्यांच्या इतर चार जणांनी त्यांना मारहाण केल्याची तक्रार आहे.अर्जुनसोंड गावात अवैद्य दारू धंदे वेश्याव्यवसाय बिनदिक्कतपणे सुरू असून ग्रामीण पोलिसांचाही त्याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप हावळे यांनी केला आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments