Advertisement

Breaking News
Loading...

वडकबाळ ते हत्तुर दरम्यान कंटेनरने चिरडल्यामुळे 5 मेंढ्याचा जागीच मृत्यू


सोलापूर- विजयपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर वडकबाळ ते हत्तुर या दोन गावाच्या दरम्यान सोलापुरहून विजापूरकडे जात असलेला कटेनर त्याचा क्रमांक आरजे 14 जी एच 77 40 या कंटेनरने पाणी पिण्यासाठी निघालेल्या मेंढ्यांच्या कळपाला जोरात धडक दिली.या धडकेत पाच मेंढ्या चिरडले गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला तर एक मेंढी गंभीर जखमी आहे.


या घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार घटनास्थळी दाखल होऊन सदर अपघाताचा पंचनामा केला.


या घटनेचा अधिक तपास विजापूर नाका पोलीस करीत आहेत.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments