Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

कुसूर- खानापूर येथे श्री अमोघसिद्ध ग्रामविकास पॅनलचा ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचा नारळ फुटला

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसुर खानापूर येथील अमोघसिद्ध मंदिरात श्री अमोघसिद्ध ग्रामविकास पॅनलचा ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचा नारळ रविवारी फुटला.श्री अमोघसिद्ध ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक १ मधून रवींद्र आमसिद्ध माशाळे,गजानन मल्लिकार्जुन बिराजदार,प्रभाग क्रमांक २ मधून शिवानंद बाबुराव हेरकर,सत्यवान महादेव माशाळे,सुमित्रा रामगोंडा सावळे,प्रभाग क्रमांक ३ मधून नानासाहेब सूर्यकांत बिराजदार,प्रियंका सिध्दाराम घाडगे,तर प्रभाग क्रमांक ४ मधून बसवराज यल्लाप्पा कोळी,मधुरा मारुती खांडेकर,जुबेदा नबीलाल शेख हे नशीब आजमावत आहेत.या पॅनलच्या वतीने लक्ष्मी मनोहर नरोटे या सरपंच पदाच्या उमेदवार म्हणून उभ्या आहेत.


दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मागील काळात गावात केलेल्या विविध विकासकामांच्या बळावर श्री अमोघसिध्द ग्रामविकास पॅनलचे सर्व उमेदवार सर्व ग्रामस्थांच्या आशीर्वादाने विजयश्री खेचून आणणार असल्याचा विश्वास प्रचार प्रमुख सुनील नांगरे सावकार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments