Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूप येथील इंदिरा नगरात सुमारे २ लाखांची घरफोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील इंदिरा नगरात जगदेवी भागण्णा रगटे (वय वर्षे ४८) यांचे अज्ञात चोरट्याने घर फोडून ४ तोळे सोने व चांदी असे १ लाख २७ हजार रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम ६६ हजार रुपये असा एकूण १ लाख ९३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शुक्रवार,दि.२९ सप्टेबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.तसेच या घराच्या जवळच असलेल्या एका घरातही चोरीचा प्रयत्न झाल्याचे दिसून येते.


या घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले,पीएसआय अमितकुमार करपे,पोलीस हवालदार विक्रम माने,कृष्णा पवार,माजिद शेख आदींनी घटनास्थळी धाव घेतली.यावेळी सोलापूरहन श्वानपथक देखील मागविण्यात आले,मात्र श्वानालाही चोरांचा सुगावा लागला नाही.अधिक तपास मंद्रूप पोलीस करीत आहेत.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments