Advertisement

Breaking News
Loading...

टाकळी येथे दारुच्या नशेत हवेत गोळीबार करुन दहशत निर्माण करणार्‍या पाच आरोपींना मंद्रूप पोलीसांनी केली अटक

फिर्यादी पोकॉ रोहन पवार यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी सिद्धाराम चंद्रकांत जानकर,नागेश बहिरप्पा साबळे,शरणाप्पा हनुमंत पाटील,तिघेही रा.चिंचपूर,ता.द.सोलापूर,शिवशरण खंडाप्पा दूधभाते,अंकुश आमसिद्ध घोडके दोघेही रा.टाकळी,ता.द.सोलापूर या पाचही आरोपींनी हवेत गोळीबार करून लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याबद्दल मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत मंद्रूप पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,दि.21 आँक्टोबर 2023 रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते दि.22 आँक्टोबर 2023 रोजी मध्यरात्री 2 वाजण्याच्या दरम्यान सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील टाकळी येथील हाॅटेल प्रशांत बियर बार आणि परमिट रूम समोर सदर इसम हे मध्यधुंद अवस्थेत भांडण करून एकमेकांचे अंगावर धावत जाऊन त्यांनी त्यांच्या जवळील रिव्हाल्वरने हवेमध्ये सार्वजनिक ठिकाणी मानवी जीवितास धोका निर्माण होईल हे माहीत असताना देखील पाच राऊंड फायर करून भीतीचे वातावरण निर्माण केले.तसेच पोलीस आल्यानंतर सुद्धा पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता त्यांचे भांडण आपापसात सुरू ठेवले आणि हवेत गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.सदर आरोपींकडून 80 हजार रुपये किंमतीची एक काळ्या रंगाची रिव्हाल्वर त्यामध्ये पाच पुंगळ्या व एक जिवंत काडतूस असलेले व रिव्हाल्वर ठेवण्याच्या लेदरच्या ब्राउन रंगाच्या पाऊचमध्ये दोन जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहे.


सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून भादवि कलम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951,शस्त्र अधिनियम 1959 च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास मंद्रूप पोलीस ठाण्याचे सपोनि प्रशांत हुले हे करीत आहेत.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments