Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

डॉ.बी.एम.भांजे सरांचे महाविद्यालय व विद्यापीठ विकासातील योगदान विसरणे अशक्य; शोकसभेत मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना



शांत, संयमी, मितभाषी, निगर्वी व सुस्वभावी असणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड निघून गेले. डॉ भांजे सरांनी केलेले शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर , स्वामी विवेकानंद संस्था, वालचंद व संगमेश्वर महाविद्यालय येथे शैक्षणिक व अध्यापन क्षेत्रात केलेले कार्य न विसरणारे आहे. पुढे प्राचार्य म्हणून दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे संतोष भीमराव पाटील महाविद्यालयाची यशस्वी धुरा सांभाळत ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी डॉ.भांजे सरांमुळे घडलेले आहेत.शिवाय महाविद्यालय व विद्यापीठ विकासातील त्यांचे योगदान विसरणे अशक्य असल्याचे भावोद्गार गोविंदश्री मंगल कार्यालय सोलापूर येथे झालेल्या शोकसभेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले.

 

मंद्रुप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी एम भांजे यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या शोकसभेचे आयोजन सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ,प्राचार्य संघटना,भुगोल अभ्यास मंडळ,अपूर्वा अभिमित ज्ञानपीठ सोलापूर,आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर व प्राचार्य डॉ.भांजे मित्रपरिवार यांनी केले होते.या शोकसभेत सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ इरेश स्वामी,यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा,माजी प्राचार्य जयप्रकाश बिले,सोशल महाविद्यालयाचे माजी प्राचार्य के.एम.जमादार, दक्षिण सोलापूर तालुक्याचे नेते बाळासाहेब शेळके,संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढ्याचे प्राचार्य डॉ एन.बी.पवार,सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ या संस्थेचे खजिनदार प्रा.व्हि.के.पाटील,संस्थेचे संचालक नागेश बिराजदार,अक्कलकोट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस. सी.आडवितोट,वालचंद महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ.उत्तमकुमार चौगुले,संगमेश्वर महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ एन.बी.तेली व प्राध्यापक डॉ महादेव देशमुख, सोलापूर विद्यापीठ माजी क्रीडा संचालक डॉ एस.के.पवार , वसुंधरा कला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ मीना गायकवाड, माऊली महाविद्यालय वडाळ्याचे प्र. प्राचार्य डॉ. हरवाळकर, सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण संघटनेचे श्रावण बिराजदार, शिवराज पाटील, माजी विद्यार्थी व पत्रकार अमोगसिध्द मुंजे व ललिता टेळे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ जवाहर मोरे यांनी केले.

 दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments