Advertisement

Breaking News
Loading...

जय हिंद साखर कारखान्यातून लोखंडी प्लेटची चोरी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव येथे जय हिंद साखर कारखान्यातून लोखंडी प्लेटची चोरी केल्याची घटना घडली.याप्रकरणी ७ आँक्टोबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यशवंत जायाप्पा गायकवाड (वय ४५,रा.वृंदावन सोसायटी,नवीन आरटीओ कार्यालय,सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किरण खीरालाल चव्हाण (वय वर्षे ३२,रा.बोरोटी,ता.अक्कलकोट) याच्या विरोधात वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जयहिंद साखर कारखान्यातील ३० किलो वजनाच्या तीन नग लोखंडी प्लेट,४० किलो वजनाचे लहान-मोठ्या आकाराच्या प्लेटा असा एकूण ३ हजार ९०० रुपयांचा माल चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.अधिक तपास वळसंग पोलीस करीत असल्याची माहिती सोमवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments