Advertisement

Breaking News
Loading...

थांबलेल्या बैलगाडीला धडकल्याने तरुणाचा मृत्यू


मोहोळ तालुक्यातील येलमवाडी येथे समोर थांबलेल्या बैलगाडीला धडकून एक दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली.दरम्यान या या प्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात मयत दुचाकीस्वारावर स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी मोहोळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सावकर सदाशिव ढेरे ( वय वर्षे ५५,राहणार मोहोळ) असे त्या मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.मयत सावकर ढेरे हे शुक्रवारी संध्याकाळी आपली दुचाकी त्याचा (क्र एम एच १३ सी आर १७९३) वरून मालवंडीकडून बोपले कडे येत असताना यल्लमवाडी गावाजवळ समोरील बैलगाडीला त्यांची दुचाकी धडकली.यात सदर दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडला.या घटनेची नोंद मोहोळ पोलिस ठाण्यात झाले असून अधिक तपास मोहोळ पोलीस करीत असल्याची माहिती सोमवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.


दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments