Advertisement

Breaking News
Loading...

आईच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वडिलांवर गुन्हा दाखल



फिर्यादी शुभम मोहन ढेकळे,वय वर्षे २२,रा.कासेगाव,ता.द.सोलापूर यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल त्याचा क्रमांक एमएच १३ ईबी ६९४६ चा चालक वडील मोहन दत्तात्रेय ढेकळे,राहणार कासेगाव,तालुका दक्षिण सोलापूर यांनी कासेगाव ते वडजी,बोरामणी जाणार्‍या रोडवर जंजाळ तलावा जवळील संभाजी गाजरे यांच्या शेताजवळून जाणाऱ्या रोडवर त्यांच्या ताब्यातील मोटर सायकलच्या पाठीमागील सीटवर आई प्रतिभा मोहन ढेकळे,राहणार कासेगाव हिला बसवून घेऊन जात होते.वडिल मोहन ढेकळे यांनी त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल ही भरधाव वेगाने चालवून अचानक ब्रेक मारल्याने मोटरसायकल घसरून पडली.त्यात फिर्यादीची आई ही रोडवर पडल्याने तिच्या डोक्यास जबर मार लागून ती उपचारादरम्यान मयत होण्यास कारणीभूत झाले आहे.म्हणून वडील मोहन दत्तात्रय ढेकळे यांच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस हवालदार लोखंडे हे करीत असल्याची माहिती रविवारी प्रेसनोटच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments