Advertisement

Breaking News
Loading...

टाकळी येथे हवेत गोळीबार प्रकरणातील ५ आरोपींना जिल्हा न्यायालयाकडून जामीन; अँड.नागेश खिचडे

 टाकळी येथे हवेत गोळीबार प्रकरणातील ५ आरोपींना जिल्हा न्यायालयाकडून जामीन; अॅड.नागेश खिचडे यांची माहिती


दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर येथील रहिवाशी सिध्दाराम चंद्रकांत जानकर,नागेंद्र भैरप्पा साबळे,शरणप्पा हणमंतराव पाटील,तिघेही राहणार टाकळी,तालुका दक्षिण सोलापूर,शरणप्पा खंडप्पा दुधभाते,राहणार कुरघोट,तालुका दक्षिण सोलापूर,अंकूश आमसिध्द घोडके या पाचही जणांची दक्षिण तालुक्यातील टाकळी येथे हवेत गोळीबार केल्या प्रकरणी न्यायदंडाधिकारी एस.पी.पाटील यांनी अटी,शर्तीसह २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीनावर मुक्तता केल्याची माहिती अॅड.नागेश खिचडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.


सदर खटल्यात आरोपीतर्फे अँड.नागेश खिचडे तर सरकारतर्फे अँड.देवमाने यांनी काम पाहिले.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments