Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

सावळेश्वर येथे मराठा समाज बाधंवाच्या वतीने दोन दिवसीय साखळी उपोषण



आंतरवाली सराटी येथे घडलेल्या प्रकाराचा निषेध म्हणून आणि राज्यातील संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी मधून 50% आरक्षण 24 आँक्टोबरच्या आत सरकारने द्यावे या मागणीसाठी मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथे मराठा समाज बाधंवाच्या वतीने दोन दिवसीय साखळी उपोषण करण्यात आले आहे.या आंदोलनासाठी सावळेश्वर पंचक्रोशीतील मराठा बांधवांसोबत लोकशाहीच्या मार्गाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून उपोषण करणारे जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवांच्या वेदना जाणून घेत आहेत.मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आजवर अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या असून अनेकांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली आहे.त्याचाच एक भाग म्हणून आणि आंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा समाजावर अमानुषपणे करण्यात आलेल्या मारहाणीचे बाबत जरांगे पाटील यांचे समर्थन करण्यासाठी दोन दिवसीय उपोषण करण्यात येत असल्याचे मराठा समाज बांधवांनी सांगितले.या उपोषणाची सुरुवात गावातून दिंडी काढून करण्यात आली.या साखळी उपोषणामध्ये सर्वप्रथम सुधीर नीळ,दादा हावळे,महेश सुरवसे,उमा तरडे,जेष्ठ नागरिक सरुबाई अंबुरे,उमेश माने,राहुल नीळ यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात येत आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments