Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

सदलापूर ते सलगर दरम्यान दरोडा टाकल्या प्रकरणी यल्लालिंग महाराजासह ८ जणांची जिल्हा न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता

कट रचून दरोडा टाकल्या प्रकरणी होटगी मठाचे बालयोगी यल्लालिंग महाराजसह ८ जणांची सबळ पुरावा अभावी जिल्हा न्यायाधीश आर.एन.पांढरे यांनी निर्दोष मुक्तता केली.


यात हकीकत अशी की,यातील फिर्यादी मल्लिकार्जुन इरण्णा लोहार वय-४५ वर्षे,रा.सलगर,ता.अक्कलकोट हे त्यांचे आजोबा सिध्दण्णा लोहार यांच्या नावे करजगी येथील ४ एकर पैकी २ एकर शेती यातील आरोपी महिबुब शेख यास रक्कम रु.१० लाख इतक्या रकमेस

साठेखत करुन दिली होती,लागलीच यातील आरोपी अल्लाबक्ष हगलदिवटे यांची शेतजमीन साठेखतटव्दारे घेतली होती.सिध्दण्णा लोहार हे वयस्कर असल्याने सदर रकमेपैकी शेतावरील बोजा कमी करण्याकामी दि.१७ आँक्टोबर २०१५ रोजी अल्लाबक्ष हगलदिवटे व सासू गंगाबाई यांचेसह फिर्यादीने रक्कम रु.४ लाख घेऊन शिरवळ येथील बँक ऑफ इंडिया या खात्यावर पैसे भरुन बोजा कमी करण्याकामी गेल्या असता,बँकेचे भरणावेळ संपल्याने सदर पैसे पिशवीत घेऊन मोटरसायकलवर सदलापूर मार्गे सलगरकडे निघाले असता,पाठीमागून विना नंबरच्या मोटरसायकलीवर आरोपी येवून डोळ्यावर मिर्ची पावडर टाकून,चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देवून रक्कम रु.४ लाखसह एक लावा कंपनीचा मोबाईल व मोटार सायकलची चावी हिसकावून घेतली.पध्दतशीरपणे कट रचून दरोडा टाकल्या प्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात आरोपी १) रमाकांत मधुकर शिवशेट्टी रा.देगांव, सोलापूर २) मयत नागेश शावरप्पा गायकवाड,३)मल्लिकार्जुन सिध्दप्पा लोहार,४)अल्लाबक्ष साहेबलाल हगलदिवटे ५) महिबुब हुसेनी शेख,रा.करजगी,ता.अक्कलकोट ६)सागर दशरथ गायकवाड रा.आहेरवाडी,ता.दक्षिण सोलापूर ७)यल्लालिंग गुरुनाथ व्हनमाने रा.होटगी ता.दक्षिण सोलापूर ८) निंगप्पा धोंडप्पा गावडे रा. सिंदखेड,ता.दक्षिण सोलापूर,९) धोंडप्पा सिद्राम बोळशेट्टी,रा.कर्जाळ,ता.अक्कलकोट यांच्या विरुध्द गुन्हा नोंद होवून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस सब इन्पेक्टर पी.पी.सुर्वे यांनी करुन दोषारोपत्र न्यायालयात सादर केले होते.


सदर केसच्या सुनावणी वेळेस सरकारपक्षाने एकूण ११ साक्षीदार तपासले.अंतिम युक्तीवाद वेळी आरोपी यल्लालिंग व्हनमाने व निंगप्पा गावडे यांचे वकील अँड.नागेश खिचडे यांनी साक्षीदारांच्या साक्षीमधील विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.सदर युक्तीवाद ग्राह्य धरुन सबळ पुराव्या अभावी आरोपी यल्लालिंग महाराजसह ८ जणांची निर्दोष मुक्तता केली.


यात आरोपी तर्फे अँड.बी.ए.जाधव,अँड.आर.एस.म्हात्रे,अँड.ईनामदार,अँड.नागेश खिचडे तर सरकार पक्षा तर्फे अँड.शैलजा क्यतम यांनी काम पाहिले.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments