Advertisement

Breaking News
Loading...

जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी अटकेत असलेल्याजिल्हा न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर; ॲड.नागेश खिचडे यांची माहिती

 जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी अटकेत असलेल्या राजूर येथील आरोपीचा जिल्हा न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर; ॲड.नागेश खिचडे यांची माहिती





महिलेचा विनयभंग व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजूर येथील विकास राधाकृष्ण पाटील (वय वर्षे ३१) याला जिल्हा न्यायाधीश के.डी.शिरभाते यांनी सशर्त जामीन मंजूर केला.


आरोपीच्या जामीन अर्जाच्या युक्तिवादावेळी आरोपीचे वकील अँड.नागेश खिचडे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन जिल्हा न्यायाधीशांनी आरोपीस सशर्त जामीन मंजूर केला.यात आरोपी तर्फे ॲड.नागेश खिचडे तर सरकारतर्फे ॲड.बुजरे यांनी काम पाहिले.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments