Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

पत्रकार सागर कोळी यांचा असाही प्रामाणिकपणा; पैशाने भरलेले पाकीट दिले परत


 पत्रकार सागर कोळी यांचा असाही प्रामाणिकपणा; पैशाने भरलेले पाकीट दिले परत

सध्याच्या काळात लोकांमध्ये माणुसकी राहिलेली नाही असं सहज बोलता बोलता बोललं जातं.परंतु,आजच्या जमान्यातही काही लोकांमध्ये हा प्रामाणिकपणा टीकून आहे.याचा प्रत्येय दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका पत्रकाराच्या कृतीतून दिसून आलाय.डोणगाव सोलापूर रोडवरील ब्रीजवर पडलेलं पाकीट अकोले- मंद्रूप येथील हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टलचे पत्रकार सागर कोळी यांनी प्रामाणिकपणे मुळ मालक डोणगावचे उद्योजक राहुल रसाळ यांना परत केलंय.माणुसकी टिकून आहे.याची प्रचिती देणारे उदाहरण पत्रकार सागर कोळी यांनी दाखवून दिलंय.सागर कोळी यांच्या या कृतीचं सध्या समाज माध्यमातून कौतुक करण्यात येतंय.

डोणगाव- सोलापूर रोडवरुन पत्रकार सागर कोळी हे आपल्या दुचाकीने प्रवास करित होते.यावेळी रस्त्यावर पडलेलं एक पाकीट दिसलं.दुचाकी थांबवून त्यानी हे पाकीट उचलून घेतलं तर त्यात मोठी रक्कम असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.परंतु,पाकीट उचलूनछू मिळालेल्या पैशांचा मोह न ठेवता पाकिटात कोणाचा पत्ता सापडतो का याचा तपास त्यानी केला.व्हाटसअप ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी ही माहीती प्रसारित केली.मुळ मालकाला ही बाब कळाली.त्यांनी सागर कोळी यांना संपर्क साधून खात्री पटवून ते पाकीट परत घेतले.सापडलेल्या पाकिटात काही महत्त्वाची कागदपत्रे होती.आपले हरवलेले पाकीट परत मिळाल्याने मालकाच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होतं.सोलापूर शहर भाजपचे कार्यालय प्रमुख सुनील टोणपे हे उपस्थित होते.


सध्या सोशल मीडियावर पत्रकार सागर कोळी यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments