Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

कुंभारी जिल्हा परिषद प्राथमिक उर्दु शाळेत अज्ञात चोरट्याने सुमारे ₹ २० हजार किंमतीच्या शालेय साहित्याची केली चोरी

 कुंभारी जिल्हा परिषद प्राथमिक उर्दु शाळेत अज्ञात चोरट्याने सुमारे ₹ २० हजार किंमतीच्या शालेय साहित्याची केली चोरी; वळसंग पोलीसात गुन्हा दाखल



दि- 20 जानेवारी 2024 रोजी सकाळी साडे अकरा वाजल्यापासून ते दि.22 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान जि.प.प्रा.ऊर्दु शाळा,कुंभारी,ता.द.सोलापूर येथे इयत्ता सातवी वर्गाचे कुलुप व कडी तोडुन आत प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने शाळेतील विविध साहित्याची चोरी केली आहे.यासंदर्भात मुख्याध्यापिका नुरजहाँ जावेद शेख,(वय वर्षे 49),राहणार साऊथ लष्कर,सोलापूर यांनी वळसंग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यात 10 हजार रुपये किंमतीची एक आयवा कंपनीची 32 इंची स्मार्ट एल.ई.डी.अल्ट्रा एच.डी.टी.व्ही,10 हजार रुपये किंमतीची एक चायना कंपनीची होम सिनेमा एल.ई.डी.प्रोजेक्टर,सोबत जुने शिक्षक हजेरी आणि विध्यार्थी हजेरी रजिस्टरची बॅग असे एकुण 20 हजार रुपये किंमतीचे शाळेचे साहित्य चोरुन नेले आहे.म्हणुन अज्ञात चोरट्या विरुध्द वळसंग पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची फिर्याद देण्यासाठी फिर्यादीकडुनच उशिर झाल्याचे तक्रारीत नमूद असून बुधवार,दि.२४ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल फुलारी या करीत आहेत.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments