Advertisement

Breaking News
Loading...

यत्नाळ येथे पत्नीचा खुन करणार्‍या पतीला अक्कलकोटच्या न्यायालयाने सुनावली ३ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी

 यत्नाळ येथे पत्नीचा खुन करणार्‍या पतीला अक्कलकोटच्या न्यायालयाने सुनावली ३ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी

फिर्यादी शिवलिंग चनबसप्पा नंदर्गी (वय 58),रा.दिंडुर,ता.दक्षिण सोलापूर यांनी वळसंग पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार दि.31 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादीची मुलगी रेखा हिचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील यत्नाळ येथील राहत्या घरात तिचा पती शरणबसप्पा उर्फ संजय महादेव हिरोळे याने घरगुती भांडणाचा राग मनात धरुन रेखा यांचा केबल वायरने गळा आवळुन खुन केला आहे.म्हणुन आरोपी शरणबसप्पा उर्फ संजय महादेव हिरोळे,रा.यत्नाळ याच्याविरुध्द भादवि कलम 302 प्रमाणे वळसंग पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा तपास वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगले हे करीत आहेत.आरोपीस अटक करण्यात आली असून त्याला अक्कलकोटच्या न्यायालयाने दिनांक 3 फेब्रुवारी 2024 पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड दिल्याची माहिती वळसंग पोलीसांकडून शुक्रवारी देण्यात आली आहे.घटनास्थळी अक्कलकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी देखील भेट दिली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments