Advertisement

Breaking News
Loading...

कुमठा नाका येथे हातभट्टी दारुची दुचाकीवरुन वाहतुक करणार्‍या मुळेगाव तांडा येथील दोघांना सदर बझार पोलीसांनी केले जेरबंद

कुमठा नाका येथे हातभट्टी दारुची दुचाकीवरुन वाहतुक करणार्‍या मुळेगाव तांडा येथील दोघांना सदर बझार पोलीसांनी केले जेरबंद



सोलापूर शहरातील कुमठा नाका येथील लेप्रसी कॉलनी येथे दि. 10 मार्च रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीवरून २ इसम हातभट्टी दारूने भरलेल्या तीन मोठे ट्युब घेऊन जात होते. पोलीसांना पाहून त्यांनी आपली दुचाकी एका बोळात वळवली. परंतु त्या बोळात पुढे जायला जागाच नसल्याने ते तेथेच थांबले. पोलीसानीही त्यांचा पाठलाग करुन दोघांना जेरबंद केले. 

मिथुन शंकर राठोड (वय 36), भिलसिंग तोळाराम पवार (वय 34) , दोघेही रा. मुळेगाव तांडा, ता. द, सोलापूर असे जेरबंद केलेल्या आरोपींची नांवे आहेत. त्यांच्या कब्जात तीन ट्युबमध्ये 11 हजार 500 रुपये किंमतीची 230 लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे. तसेच ऍक्टिवा मोटरसायकल याची अंदाजे किंमत 32,000 रुपये असा एकूण 43,500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन्ही इसमांवर महाराष्ट्रात दारूबंदी कायदा कलम 65 (अ) (ई) प्रमाणे सदर बझार पोलीस ठाणे येथे पोलीस कॉन्स्टेबल पुजारी यांनी फिर्याद दिली असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार संतोष पापडे हे करीत आहेत.

   *कारवाई पथक :-* पोहेकाँ/548 संतोष पापडे, पो.हे.कॉ.1405/तिमिर गायकवाड, पो.हे.कॉ. 422/संतोष लवटे, पो.कॉ.1724/पुजारी.

 ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...

Post a Comment

0 Comments